रायसोनीत इन्स्टिट्यूटमध्ये योग दिनाचे आयोजन

0

जळगाव । जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट व हेल्दी यु वेलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. योग दिनानिमित्त इन्स्टिट्यूटचे सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. पांढरा रंग शांततेचे प्रतिक म्हणून आपण ओळखतो. त्यामुळे यादिवशी सर्व कर्मचारी पांढरा ड्रेस परिधान करणार आहेत. योग झाल्यानंतर सर्वांसाठी योग आहार देण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या कॉरिडोरमध्ये कायर्क्रमाचे नियोजन केले आहे. त्यामुळे हेल्दी लाईफ जगण्यासाठी ज्यांना रुची आहे अशा सर्व जळगावकरांना योग दिनानिमित्त रायसोनी इन्स्टिट्यूटतर्फे कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.