जळगाव । येथील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंटमध्ये उमवि बीसीयुडीच्या सौजन्याने रिसेंट ट्रेन्स इनोव्हेशन कॉम्पुटर सायन्स आणि इन्फोरमेशन टेक्नोलॉजी या प्रमुख विषयासह 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. परिषदेत शिक्षण विभागातून प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी व उद्योग क्षेत्राशी संबंधित संशोधकांनाही संशोधन सादर करता येणार आहे. आयोजित परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून व्हीआयटी कॉलेज पुणे संगणक विभाग प्रमुख प्रा.डॉ.सचिन साखरे, डीएनसीव्हीपी इन्स्टिट्यूट जळगाव येथील डॉ.आर.बी.वाघुळदे व सेन्ट्रोनिक्स कॉम्पुटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश सेठिया तसेच परिषदेचे प्रमुख आयोजक संचालिका डॉ.प्रिती अगरवाल यांचीही उपस्थित राहणार आहे.
यांनी घेतले परीश्रम
समाजात होणार्या तांत्रिक अमुलाग्र बदलात प्रत्येकाला आपले योगदान देता यावे या हेतून राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. पंतप्रधानांनी डिजिटल इंडियाचा उचललेला विडा विकसित व्हावा तसेच माहिती तंत्रज्ञानात भारत अग्रेसर व्हावा. संशोधकांना ई.कॉमर्स, ई.गव्हर्नन्स, क्लाउड सर्विसेस, ओपन, बिगडेटा – एप्लिकेशन आणि चेलेंजेस, आर्टीफिशल इंटेलिजन्स अशा विविध विषयांवर आपला शोध निबंध सादर करता येणार आहे. परिषदेत माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक यांनी जास्तीत, जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रा.रफिक शेख व प्रा.श्वेता फेगडे यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी प्रा.गौरव जैन, प्रा.भूषण राठी, प्रा.विजय गर्गे, प्रा.कल्याणी नेवे, प्रा.नीलम सोनार, प्रा.रुपाली ढाके परिश्रम घेत आहेत.