जळगाव । येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात स्व.ग्यानचंदजी रायसोनी यांच्या 20 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने रायसोनी इन्स्टिट्यूट, लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल व इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीराच्या आयोजनाला यावर्षी दहा वर्ष पूर्ण झाले. यावेळी कार्यकारी संचालक, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी रक्तदान केले. तब्बल 241 रक्त पिशव्यांचे संकलन आयोजित शिबिरात झाले. प्रसंगी स्व.ग्यानचंदजी रायसोनी व स्व.सदाबाई रायसोनी यांच्या प्रतीमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यकारी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, प्राचार्य प्रल्हाद खराटे, लायन्स क्लबचे अध्यक्ष उत्कर्ष मेहेता, प्रकल्प प्रमुख शिरीष सिसोदिया, सुगन मुनोत, अनिष चांदीवाल, पराग लुंकड, रेडक्रॉस सोसायटीचे डॉ.प्रकाश संघवी, डॉ. अनिल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. प्रभाकर भट यांनी रक्तदानाविषयी माहिती सांगितली. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार जनसंपर्क अधिकारी अमोल बाविस्कर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वितेसाठी लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रल, रायसोनीतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.