रायसोनी अभियांत्रिकीतर्फे दोन हजार वृक्षांचे रोपण

0

जळगाव। येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालय व वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रामदेव वाडी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शासनाच्या उपक्रमात सहभागी होऊन वनविभाग परिसरात दोन हजार बाभूळ आणि खैर या झाडांचे रोपण करण्यात आले. वृक्षांची निगा राखण्यासाठी स्वतंत्र वनविभाग कर्मचारी नियुक्ती केली असल्याची माहिती वन परिमंडळ अधिकारी प्रेमराज सोनवणे यांनी दिली.

वृक्ष हेच जीवन
पाणी हेच जीवन आहे यासोबत वृक्ष हेच जीवन आहे असे म्हणावे लागेल कारण भविष्य याशिवाय जगणे कठीण आहे असा एकेरी सूर यावेळी निघाला. प्रसंगी देविदास जाधव प्रशांत भारुळे, प्रा.हरीश भंगाले, प्रा.किशोर भदाणे, प्रा.राकेश तिवारी, प्रा.राजेश दहिभाते, प्रा.विजय बोरसे, प्रा.सोनल पाटील व बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.