रायसोनी इन्स्टिट्युटमधील सर्व्हरप्रमुखाचा अपघातात मृत्यू

0

इंडिया गॅरेजसमोर रात्री 12.30 दुचाकी दुभाजकावर धडकली ः स्वतः फोनकरुन वडीलांना दिली माहिती

जळगाव- शहरातील इंडिया गॅरेजसमोर दुचाकी दुभाजकावर धडकल्याने झालेल्या अपघातात रायसोनी इन्स्टीट्युटमध्ये कार्यरत सर्व्हरविभागप्रमुखाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास घडली. स्वप्निल देविदास पवार (वय 34, रा. गायत्रीनगर, मूळ रा. भडगाव) असे मयताचे नाव आहे.

स्वप्निल पवार हे गेल्या आठ वर्षापासून रायसोनी इन्स्टिट्युटमध्ये सर्व्हरप्रमुख पदावर कार्यरत आहेत. गायत्रीनगरात आई सुनंदा, वडील देविदास, पत्नी प्रतिक्षा व पाच वर्षाचा मुलगा रुतुल या कुटूंबासमवेत ते वास्तव्यास आहेत. वडील कांताई नेत्रालयात कार्यालयीन कर्मचारी आहे. स्वप्निल पवार हे शुक्रवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे रायसोनी इन्स्टिट्युटमध्ये नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले. यादरम्यान सायंकाळी घरी परतल्यावर रात्री शहरातील संगणक दुरूस्तीच्या मित्रांच्या दुकानावर गेले. येथून रात्री 12 वाजेच्या सुमारास दुचाकीने (क्र.एमएच 19, बी.ए.2709) घराकडे परतत होते. यादरम्यान इंडिया गॅरेजजवळ जात असतांना त्यांची दुचाकी दुभाजकावर धडकली. यात ते खाली पडले.

जखमी अवस्थेत वडीलांना केला फोन
गाडीवरुन खाली पडल्यानंतर जखमी अवस्थेत त्यांनी स्वतःजवळील मोबाईलवरुन वडील देविदास पवार यांना फोन केला. वडील हे कुटुंबांसमवेत लागलीत घटनास्थळावर आले. तोपर्यंत स्पप्निल अतिरक्तश्रावामुळे बेशुध्द झाले होते. त्यांना तातडीने गणपती हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. गंभीर असल्याने याठिकाणाहून पुन्हा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी डॉ.अजय सोनवणे यांनी त्यांना मृत घोषित केले. येथे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. याबाबत डॉ. अजय सोनवणे यांच्या खबरीवरुन जिल्हापेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पुरुषोत्तम वागळे हे करीत आहेत.