रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात कोविड लसीकरण शिबीर संपन्न

विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग ; लसीकरण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

जळगाव : ता. १३ : रायसोनी इस्टीट्युट संचलित जी. एच रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोली यांच्या संयुक्त विध्यमाने रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयात अकरावी-बारावीच्या विध्यार्थ्यांसाठी कोविड लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. देशात मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या कोरोना महामारीमुळे सर्वच क्षेत्रामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहे व्यापार उद्योक दळन-वळण, शेती, धार्मिक तसेच सामाजिक कार्यक्रम, शैक्षणिक क्षेत्र या सर्वांनाच कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. देशामध्ये विविध प्रकारे कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे परंतु त्या प्रयत्नांमध्ये १०० टक्के लसीकरण होणे हाच सर्वात मोठा प्रयत्न असेल आणि ते लसीकरण शहरांसह ग्रामीण भागातही होणे गरजेचे आहे या उद्देशाने जी. एच रायसोनी कनिष्ठ महाविध्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसोली यांच्या सहकार्याने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. देशातील सर्वच भागात सर्वसामान्य जनतेपर्यंत लसीकरणाचे महत्व पोहोचल्यामुळे सर्व नागरिक आता स्वइच्छेने लसीकरणासाठी पुढे येत आहे. अशा वेळेस फक्त आरोग्य केंद्रात लसीकरण चालू ठेवले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. गर्दी हे कोरोना वाढीचे सर्वात मोठे कारण असल्याने लसीकरण केंद्र वाढवणे गरजेचे आहे. त्यामुळेच विध्यार्थ्यांच्या सोयीसाठी रायसोनी महाविध्यालयात विध्यार्थ्यांसाठी लस उपलब्ध करून देण्यात आली होती. कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्रात फार मोठे परिणाम बघायला मिळत आहे, महाविध्यालय पुन्हा सुरळीत चालू करण्यासाठी संपूर्ण विध्यार्थांची लसीकरण होणे गरजेचे आहे विध्यार्थांची १०० टक्के लसीकरण झाले तरच महाविद्यालये पूर्ववत सुरु होतील व विध्यार्थांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. सलग २ वर्षापासून महाविद्यालये बंद राहिल्याने विध्यार्थांच्या गुणवत्तेवर परिणत होतांना दिसत आहे. यावर उपाय म्हणुन महाविध्यालयीन विध्यार्थांचे लसीकरण झाले पाहिजे या उद्देशाने विध्यार्थांच्या सोयीसाठी रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी,  संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल,  अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा, रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी यांच्या प्रयत्नातून रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयामध्ये लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविध्यालयातील सुमारे १८७ विध्यार्थ्यानी लसीकरणाचा लाभ घेतला. रायसोनी कनिष्ठ महाविध्यालयातील लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरळीत पार पाडण्यासाठी शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. तेजस्विनी देशमुख व डॉ. करुणा भालेराव तसेच प्रा. संदीप पाटील, प्रा. राज कांकरिया, प्रा. शितल किंग, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. गुंजन चौधरी, प्रा. भाग्यश्री बारी, प्रा. श्रुती अहिरराव, प्रा. गायत्री भोईटे, प्रा. प्रियांका मल, प्रा. राहुल यादव, प्रा. अनिल सोनार, संतोष मिसाळ यासह सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक व प्राध्याकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.