जळगाव- जळगाव शहरात मुलभूत सुख सुविधा विकास निधी अंतर्गत विकास कामांचे भूमिपुजन नवनियुक्त महापौर सिमा भोळे यांच्याहस्ते करण्यात आले. या भूमिपूजनाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुरेश भोळे (राजुमामा) हे होते. भूमीपूजनास प्रभागाचे नगरसेविका ज्योती चव्हाण, सुरेखा तायडे, अंजना सोनवणे, भाजयुमो अध्यक्ष नगरसेवक जितेंद्र मराठे, तसेच उपगट नेते राजेंद्र पाटील, नगरसेविका गायत्री राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. केंद्रात, राज्यात व जळगाव महानगर पलिकेत भाजपाची सत्ता असून आता शहराचा विकासाला वाट मोकळी झालेली आहे. या अनुषंगाने जळगाव शहराचा कायापालट करणार असल्याचे प्रतिपादन महापौर सिमा भोळे यांनी केले. याप्रसंगी उपगट नेते राजेंद्र पाटील, नगरसेविका गायत्री राणे, प्रभाकर सोनवणे, नितीन इंगळे यांची प्रमुख आदि उपस्थित होते.