जळगाव । शहरातील जी.एच.रायसोनी पॉलीटेक्निक इन्स्टीट्युटमध्ये आराधना 2017 हे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात पार पडले. यावेळी समूह गायन, समूह नृत्य, एकल नृत्य, व्यक्तिगत गायन, पारंपारिक वेशभूषा, नाटक, रांगोळी, मेहंदी, फूड सलाड, क्रिकेट, पोस्टर्स सादरीकरण, चेस, टेबल टेनिस, सारी व टाय डे, फिल्मी डे, थीम डे व हॉरर डे अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार येथील शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य अतुल चौधरी उपस्थित होते.
असा आहे स्पर्धेचा निकाल
यावेळी आयोजित स्पर्धेत, क्रिकेट मुलांच्या गटात – प्रथम – तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल, द्वितीय – कॉम्पुटर द्वितीय वर्ष, मुलींच्या गटात प्रथम – द्वितीय वर्ष कॉम्पुटर, द्वितीय- प्रथम वर्ष मेकेनिकल, फुटबॉल – प्रथम – कॉम्पुटर विभाग, द्वितीय – मेकेनिकल विभाग, व्हॉलीबॉल – प्रथम – मेकेनिकल विभाग, द्वितीय – कॉम्पुटर विभाग, बेडमिंटन एकेरी पुरुष गटात – प्रथम- विक्रांत मोरे, द्वितीय – निखील भांडारकर, बेडमिंटन एकेरी महिला गटात – प्रथम- ग्रीष्म तेली, द्वितीय – हेमांगी बारी, बेडमिंटन दुहेरी पुरुष गटात – प्रथम -किरण पाटील,निखील भांडारकर, द्वितीय – ओमकार कावटे, प्रणव चौधरी, बेडमिंटन दुहेरी महिला गटात – प्रथम – ग्रीष्म तेली, प्रिया पाटील, द्वितीय – अर्शिया शेख, शिवानी कुलकर्णी, टी.टी पुरुष – प्रथम – प्रतिक कोष्टी, द्वितीय – आकाश गुरव, टी.टी. महिला -प्रथम – मानसी जगताप, द्वितीय- गायत्री पाटील, कॅरम एकेरी पुरुष – प्रथम – निखील चौधरी, द्वितीय – रोहित बाविस्कर, कॅरम दुहेरी पुरुष – प्रथम – आकाश गुरव,लोकेश बागुल, द्वितीय – चंदन शिंपी, जयेश सपकाळे, कॅरम एकेरी महिला – प्रथम – शुभांगी बारी, द्वितीय – गीतांजली पाटील, कॅरम दुहेरी महिला – प्रथम – शुभांगी बारी, मीनल बराठे, द्वितीय – पूनम पाटील, गीतांजली पाटील, चेस – प्रथम – कौस्तुभ कोळी, द्वितीय – पियुष किरंगे, ठरला. त्यानंतर प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यांची होती उपस्थिती
आराधना या वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात गजानना गणराया या समूह नृत्याने करण्यात आली. तदनंतर जोगवा, सात समुंदर पार मै तेरे पिछे पीछे आऊंगा, मेरे कॉलेज की एक लडकी है, तू चीझ बडी है मस्त मस्त, सोचेंगे तुम्हे प्यार करे क्या नही, बन जा तू मेरी राणी, तेरे जैसा यार कहा व अंबाबाईच्या गोंधळ नृत्यावर विद्यार्थ्यांनी चांगलाच ठेका धरला. प्रसंगी सूत्रसंचालन समीक्षा शर्मा, मानसी जगताप, व आभार ओम कावटे, शुभम पाटील यांनी मानले, तर कार्यक्रम समन्वयक म्हणून प्रा.स्वप्निल देशमुख, प्रा.पंकज पाटील, प्रा.तुषार वाघ, प्रा.नितीन पवार, प्रा.प्रतिभा चिखले, प्रा.कैलास पाटील, प्रा.मुकेश माळी, प्रा.सागर भोयर व प्रा.पूजा नरवाडे, प्रा.नेमीचंद सयनी, प्रा.जितेंद्र वाडोदकर यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.