जळगाव । जी.एच.रायसोनी बिझनेस मेनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी रायसोनी बॉक्स क्रिकेट लीग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत मेनेजमेंट मधील पदवी स्तराचे बीबीए व बीसीए शाखेतील सर्व विद्यार्थी तर पदव्युत्तर शाकेतील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. स्पर्धेतील विशेषतः म्हणजे यात मुलींनी देखील सहभाग नोंदविला होता.
देहदान एक श्रेष्ठ दान विषयावर मार्गदर्शन
फ्रेंडशिप टूर्नामेंट आयोजना मागे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंदाने व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये सलोख्याचे व मैत्रीचे संबंध निर्माण होऊन एकमेकांचा परिचय व्हावा तसेच परिसराची ओळख व्हावी असा उद्धेश होता. स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी झाले होते एकूण संघामध्ये दोन गटात साखळी सामने खेळविण्यात आलेत. यामधून उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम सामने जल्लोषात पार पडले. स्पर्धेत बीबीए द्वितीय वर्षचा संघ विजेता तर एमबीएचा संघला उपविजेता म्हणून समाधान मानावे लागले. विजेत्या गटात कर्णधार म्हणून मोहित दारा उपविजेत्या गटात विशाल वाणी यांनी जबाबदारी सांभाळली. स्पर्धेचे समन्वय म्हणून प्रा.राज कांकरिया, प्रा.प्रशांत देशमुख भूषण राठी यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक प्रा.संजय जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पारितोषिक वितारणा प्रसंगी संचालक प्रितम रायसोनी, संचालिका डॉ.प्रीती अगरवाल, विभागप्रमुख प्रा.मकरंद वाठ, रफिक शेख, इतर प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.