जळगाव । जी जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात सेकण्डशिफ्ट पॉलीटेक्निक अंतर्गत पॉलीटेक्निक मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित राष्ट्रीय स्तरावरील परोक्ष ह्या टेक्नीकल कार्यक्रमात मुंबई, नाशिक, धुळे, चाळीसगाव, औरंगाबाद, नगाव आदी शहरातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. एकंदरीत घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये जवळपास सहाशे विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला होता. स्पर्धेत तब्बल 85 हजाराचे पारितोषिके देण्यात आली.
यांना देण्यात आले पारितोषिके
यावेळी पार पडलेल्या स्पर्धेत प्रोजेक्ट सादरीकरण (विभाग पहिला) प्रथम- अक्षय चौधरी गट शासकीय पॉलिटेक्निक जळगाव, द्वितीय नम्रता मुळे गट रायसोनी पॉलिटेक्निक, प्रोजेक्ट सादरीकरण (विभाग दुसरा) प्रथम- मिथिलेश मराठे गट प्रवीण पाटील कॉलेज भायंदर, द्वितीय- सारंग काजळे गट रायसोनी अभियांत्रिकी, तृतीय- राकेश मिश्रा गट पाटील कॉलेज भायंदर, पोस्टर सादरीकरण – प्रथम- आयुष कटारिया अजय सोनवणे, द्वितीय- तेजस्वीनी सरोदे मुक्ता पाटील, तृतीय गुंजन नारखेडे पूजा ढवळे, मेकेग्रफिक्स – प्रथम- निखील सोनार, द्वितीय- स्वप्नील परदेशी, तृतीय- पुष्पक भोगे, टाउन प्लानिंग – प्रथम- मनीष मराठे मानसी पाटील, द्वितीय- सागर महाजन हर्षदा महाजन, तृतीय- अंकुश चौधरी अजिंक्य पाटील, रोबो रेस – प्रथम- आशिष चौघुले, द्वितीय- हर्षल मोरे, तृतीय- सचिन पाटील, सर्किट मानिया – प्रथम- चैत्राली जोशी, द्वितीय- नम्रता मुळे, तृतीय- शुभांगी बडगुजर, सी-क्विझ – प्रथम- चेतना गिरणारे, द्वितीय- आकाश चौधरी, तृतीय- चेतन शिंपी व एन.एफ.एस.मोस्ट वान्टेड – प्रथम- खुशबू कोळी, द्वितीय- आकाश तायडे, तृतीय- प्रवीण पाटील यांना अनुक्रमे प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पारितोषिके देण्यात आले.
प्राध्यापकांची नियुक्ती
प्रसंगी संचालक प्रितम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट, उप प्राचार्य हरिष भंगाले, समन्वयक प्रा.गणेश धनोकार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी मुंबई औरंगाबाद व जळगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना परोक्ष या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन अत्यंत उत्तम असल्याचे बोलून दाखवले. स्पर्धेत सूत्रबद्धता टिकून राहावी यासाठी प्रत्येक स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली होती.. सूत्रसंचालन अफजल अगवान तर आभार कार्यक्रम मुख्य समन्वयक प्रा.गणेश धनोकार यांनी मानले. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.