रायसोनी मेनेजमेंटमध्ये एम.बी.ए फेसिलीटेशन

0

जळगाव । येथील जी.एच.रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मेनेजमेंटमध्ये शैक्षणिक वर्ष 2017-18 करिता एम.बी.ए अभ्यासक्रमात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी डी.टी.ई अंतर्गत फेसिलीटेशन सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. फेसिलीटेशन प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज प्रक्रिया सुरुवात 15 मे पासून होणार असून 03 जून पर्यंतच नोंदणी प्रवेश घेता येईल. यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज, ऑप्शन फोर्म भरणे आणि रिसिप्ट प्राप्त करणे अशा पद्धतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण कार्यलयीन वेळेत करावी लागेल.

आवश्यक कागदपत्रे
10/12 वीचे मार्कशीट, एम.सी.ए. सीईटीचे स्कोअर कार्ड, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, डेमोसाईल व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, तीन पासपोट फोटो, एससी व एसटी जात प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सोडून इतर सर्व विद्यार्थ्यांना नॉन क्रीमेलीयर आवश्यक राहील. यावर्षी शासनामार्फत होणारया ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विविध बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे फेसिलीटेशन सेंटरमध्ये नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा शासनामार्फत मिळणारया शिष्यवृत्तीसही ते अपात्र ठरतील. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात 15 मे ते 03 जून 2017 सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे. अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरीट लिस्ट 5 जूनला सायंकाळी 5 वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. प्रवेश प्रक्रियेची अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी 9823337862 वर संपर्क साधावा. असे आवाहन संचालिका डॉ.प्रीती अगरवाल यांनी केले आहे.