रावण दहन प्रथा बंद न केल्यास अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करणार

0

यावल तालुक्यातील भीम आर्मी संघटना व आदिवासी एकता परीषदेचा इशारा

यावल- तालुक्यातील भीम आर्मी संघटना व आदिवासी एकता परीषदेच्या वतीने रावण दहन प्रथा बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. विजया दशमीला शहर व तालुक्यात विविध ठिकाणी रावन दहण केले जाते. तेव्हा ही प्रथा बंद न केल्यास संबधीत रावन दहण करणार्‍या आयोजकांवर आदिवासी संघटना थेट अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअन्वये गुन्हा दाखल करणार असल्याचे तहसील कार्यालय व पोेलिस ठाण्यात लेखी निवेदन देवून ईशारा देण्यात आला आहे.

राजा रावण आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान
गुरूवारी विजयादशमी अर्थात दसरा सण आहे. त्या निमित्ताने यावल शहर सह ग्रामीण भागात विविध ठिकाणी रावण दहन कार्यक्रम घेतले जातात मात्र यंदापासून ही प्रथा बंद करण्याची मागणी भीम आर्मी संघटना व आदिवासी एकता परीषदेकडून करण्यात आली आहे. मंगळवारी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर.बी.माळी यांनी भीम आर्मीकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार महात्मा राजा रावण हे अत्यंत समृद्ध संस्कृतीच्या वैभवशाली वारशांचा दैदिप्यमान अविस्मरणीय ठेवा आहे. महात्मा राजा रावण हे संगीतज्ञ, राजनीती शिल्पकार, निती तज्ञ, आयुर्वेदाचार्य, विवेकवादी, उत्कृष्ट रचनाकार व समता समाज व्यवस्थेचा न्यायप्रिय राजे होते अशा अनेक गुणांनी अविष्कार करणारा महत्तम राजा होता. अशा महान राजाला तिथल्या सरकारी व्यवस्थेने बदनाम करण्याची कोणतीच कसर ठेवली नाही. महात्मा राजा रावण यांची भारतात अनेक ठिकाणी मंदिरे व मूर्ती आहेत. एकट्या तामिळनाडू मध्ये रावणाची 352 मंदिरे आहेत रावण यांची सर्वात मोठी मूर्ती मध्यप्रदेशात मंदसौर येथे ऊन अंदाजित 15 मीटर उंचीची आहे तसेच महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यातील मेळघाट, छत्तीसगड, झारखंड इत्यादी ठिकाणी रावण राजाची पूजा केली जाते. ते आदिम संस्कृतीचे श्रद्धास्थान आहेत. तरी आदिवासी समाजाचे भावना लक्षात ठेवून ही प्रथा बंद करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन भिम आर्मीचे तालुकाध्यक्ष पंकज मेघे, भिकारी सोनवणे, समाधान तायडे, अक्षय तायडे, मनोज मेघे, सुजीत मेघे, अमोल तायडे, योगेश मेघे, बुध्दभुषण मेघे, किशोर सोनवणेे, शरद मेघे, राजेंद्र मेघे, जितेंद्र सोनवणेे, हर्षल मेघे, अजय मेघे, कुंदन तायडे, आकाश तायडे, सनी मेघे, सागर सोनवणेे, धीरज मेघे सह मोठ्या संख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

..अन्यथा अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा
महाज्ञानी राजा रावण हे आदिवासी महाराजा होते तेव्हा त्यांच्या अशा प्रकारे दहन करून अमानवी कृत्य बंद करावे व तालुक्यात कुणी जर रावण दहन केले तर त्यांच्या विरोधात संघटनेच्या वतीने आयोजकांवर थेट अ‍ॅट्रॉसिटी सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करू, असे निवेदन पोलिस निरीक्षक डी. के. परदेशी यांना परीषदेचे तालुकाध्यक्ष यशवंत आहिरे, भिका भील, सदाशीव भील, महेंद्र भील, अतुल भील, सुधाकर भील, प्रकाश भील, संतोष भील, सदाशिव भील, नाना भील आदी उपस्थित होते.