रावलांच्या कामांनी प्रभावित होऊन भाजपात

0

शिंदखेडा । शिंदखेडा शहरात गेल्या 30 वर्षापासुन दरवर्षी 8 महिने भीषण पाणीटंचाई जाणवत होती. शहराला विविध समस्यांनी ग्रासले होते. शिंदखेडा हे तालुक्याचे शहर असतांना याठिकाणी ग्रामपंचायत अस्तित्वात होती. पंरतू ही सर्व कामे जयकुमार रावल यांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. ही सर्व कामे मार्गी लागल्यामुळे शिंदखेडा शहराच्या सौदर्यांत भर पडली आहे.

दहा नगरसेवकांसह मुंबईत प्रवेश
नगरपंचायतीमुळे विकासाचा निधी देखील मोठया प्रमाणावर येतो. यामुळे नागरी सुविधा पुरविणे नगरपंचायतीला सोपे होत आहे. कॉग्रेस पक्षाचे काम करीत असतांना देखील पक्षीय राजकारण बाजूला ठेवून त्यांनी शिंदखेडा शहरासाठी भरगोस निधी दिला. त्यांच्या या विकासाच्या धडाक्याला प्रभावित होवूनच सर्व नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया शिंदखेडयाचे गटनेते अनिल वानखेडे यांनी दिली आहे. शिंदखेडा शहराचे कॉग्रेसचे दिग्गज नेते अनिल वानखेडे यांनी आपल्या 10 नगरसेवकांसह मुंबईतील प्रदेश कार्यालयात वित्त व वनमंत्री तथा माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार आणि रोहयो व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यांच्या भाजपा प्रवेशामुळे आगामी शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे चित्र बदलणार असून त्यांच्या रूपाने भाजपाला नगरपंचायतीत शिरकाव करण्याची चांगली संधी प्राप्त झाली आहे.