रावसाहेब दानवेंचा मंत्रिमंडळात समावेश!

0

मुंबई : आज नरेंद्र मोदी आणि त्यांचा मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव निश्चित झाले आहे. आज ते मंत्रीपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान आता त्यांच्या जागी भाजपचा प्रदेशाध्यक्ष कोण होईल याकडे लक्ष लागले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षपदी काही महत्त्वाची नावे चर्चेत आहेत. अमित शाह यांचे अत्यंत विश्वासू चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि भाजपचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे मंत्री गिरीश महाजन, आमदार संजय कुटे, सुरजितसिंह ठाकूर, संभाजी पाटील निलंगेकर, आशिष शेलार अशी नावे चर्चेत येत आहेत.