जळगाव। दानवे हे भूमिपूत्र असल्यामुळे त्यांना शेतकर्यांची जाण आहे मात्र त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. भाजपा विरोधी व्यक्ती व पक्ष संघटनांनी बोंबाबोंब चालू केली असून भाजपाला मिळालेल्या एकहाती सत्तेमुळे इर्षेच्या भावनेने विरोधकांनी रावसाहेब दानवे यांच्या शब्दाचा विपर्यास करू दानवे व भाजपाची बदनामी चालविली आहे. मुलांनीही साले अभ्यास करत नाही असे म्हणतांना पाहिले आहे. तशाच प्रकारे दानवेंनी वडिलकीच्या नात्याने कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्यात हे भाषण कार्यकर्त्यांच्या प्रबोधनासाठी होते.
शेतकर्यांसाठी नव्हे परंतु त्याचा थेट संबंध शेतकर्यांशी जोडून दानवे यांच्याबद्दल विरोधकांनी रान पेटविले आहे. भाजपाची सरशी होत असल्यामुळे विरोधकांमुळे भाजपाविरूद्ध बोलायला एकही मुद्दा नाही. त्यामुळे ध चा म करून दानवे प्रकरणाला शेक दिले जात आहे. असे उदय वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.