राविकाँच्या वतीने 17 हजार वह्यांचे वितरण

0

धुळे । राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने 10 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून धुळे शहरातील तसेच जिल्ह्यातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांना 17 हजार मोफत वहयांचे वाटप करणार आहे. येत्या जुन महिन्यात नविन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. साधारणता 15 जुन पासुन शहरातील तसेच ग्रामीण भागातील सर्व शाळा महाविद्यालये सुरु होणार आहेत.

गरीब विद्यार्थ्यांना आवाहन
जिल्ह्यात अनेक गरजु व होतकरु विद्यार्थी आहेत. या गरजु व होतकरु विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस हा मोफत वहया वाटपाचा उपक्रम शहरात व ग्रामीण भागात राबविणार आहे. महानगरपालिका व जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या शाळांमधुन या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे उपक्रमासाठी यशवर्धन कदमबांडे यांनी गरजू शाळांना तसेच विद्यार्थ्यांना व पालकांना आवाहन केले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देखील राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.