मोरेश्वर भोंडवे मित्र मंडळ व रावेत प्राधिकरण नागरिक समितीतर्फे आयोजन
रावेत : येथील मोरेश्वर भोंडवे मित्र मंडळ आणि रावेत प्राधिकरण नागरिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने रावेत, प्राधिकरणातील मैदानावर ‘नवरात्र उत्सव 2017’ चे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. याठिकाणी दांडिया खेळण्यासाठी तरुणाईची प्रचंड गर्दी उसळत आहे. सलग दोन दिवस सुट्टीचे औचित्य साधत गरबाप्रेमींनी रविवारी रास दांडिया खेळण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
संयोजनात यांचा हातभार
या उपक्रमाचे संयोजन नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नागरिक समितीचे अध्यक्ष आर. आर. शिंदे, उपाध्यक्ष बाळासाहेब कुंभार, सचिव पवन खटावडे, खजिनदार संतोष रेगे, संघटक रुपेश हांडे, तेजस देशपांडे, समीर चौधरी, रोहन भुरके, प्रशांत भोसले, गौतम तुंगारे, सोमनाथ हरपुडे, बाबा पाटील, अतुल महालपुरे, अतुल शेटे, प्रसाद राजगुरव तसेच, जयश्री भोंडवे, लीना भुरके, वर्षा आटोळे, स्वाती अग्रवाल, स्वाती पाटील, उर्मिला गायकवाड, प्रणाली हारपुडे, रजनी बडगुजर, माधुरी शिंदे, शकुंतला कावळे, नंदा शिंदे, स्वाती आटोळे, अलका गरड, वैशाली जाधव, वीणा हांडे, मोहिनी चौधरी यांनी केले आहे. तीर्थस्वरूप ज्येष्ठ नागरिक संघ, लोकमान्य गणेशोत्सव कमिटी, राष्ट्रमाता जिजाऊ महिला संघ, ऋग्वेद महिला भजनी मंडळ, वीर सावरकर युवा संघ आदी मंडळाचे कार्यकर्ते महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.