एकूण तीन बांधकामे पाडली
रावेत- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत व अ तिक्रमण विभागाने रावेत, किवळे येथील अनधिकृ त बांधकावर हातोडा चालविला. मंगळवारी के लेल्या कारवाईत एकूण तीन बांधकामे पाडण्यात आली. ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक 16 येथील रावेत व किवळे अनधिकृत बांधकामे झाली होती. या अनधिकृत बांधकामांवर पालिके च्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली. कारवाईमध्ये आरसीसी एक व पत्राशेड दोन असे एकुण तीन बांधकामावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली. कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे, कनिष्ठ अभियंता व बीट निरीक्षक यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारवाई पाच मनपा पोलीस, एक जेसीबी, दहा मजूर, दहा पालिकेच्या क र्मचार्यांच्या सहाय्याने करण्यात आली. कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात क रण्यात आला होता.