रावेरचा लाचखोर वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

1
लाकडाचा ट्रक व ट्रॅक्टर सोडण्यासाठी स्वीकारली एक हजार 700 रुपयांची लाच
रावेर- लाकूड व्यावसायीकाचा पकडलेला ट्रकसह ट्रॅक्टर सोडण्यासाठी एक हजार 700 रुपयांची लाच मागणार्‍या रावेर वनविभागाच्या वनरक्षकाला जळगाव एसीबीने शुक्रवारी रंगेहाथ अटक केली. रसलपूरच्या लाकूड व्यावसायीक तक्रारदाराने याबाबत तक्रार नोंदवली होती. संशयीत आरोपी तथा रावेरचा वनरक्षक विकास देविदास सोनवणे (35, फॉरेस्ट कॉलनी, रावेर) याने लाकडाची वाहने सोडण्यासाठी दोन हजारांची लाच मागितली होती तर तडजोडीअंती एक हजार 700 रुपये देण्याचे ठरले. आरोपीला पंचांसमक्ष लाच घेताना शुक्रवारी दुपारी रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार्‍यांनी यशस्वी केली.