रावेरच्या अंकित अग्रवालने बनवला लघपूट

0

‘पाखर‘ ला सोशल मिडीयावर उत्स्फूर्त दाद

रावेर- शहरातील अंकित अग्रवाल याने ‘पाखरं’ नावाचा लघूपट बनविला असून हा लघूपट चित्रपट सद्या यु ट्युबवर मोठ्या प्रमाणात सर्च होत असून 12 जून रोजी अपलोड करण्यात आला आहे. लघूपटाची निर्मिती अंकितनेच केली असून तो शहरातील न्यू अग्रवाल ज्वेलर्सचे संजय अग्रवाल व किरण अग्रवाल यांचा मुलगा आहे. हा लघूपट तीन मित्रांवर आधारीत आहे. लघूपटात हे तिघ मित्र त्यांच्या प्रवासात कसे हरवतात व त्यांना त्या प्रवासात काय अनुभव येतात ? ते दाखवण्यात आले आहे.

मंगरूळसह खानापूरात लघूपटाचे शुटींग
अंकितने बारावीचे शिक्षण संपल्यानंतर मुंबईच्या व्हीसलींग वुड्स या इंस्टीट्युट मध्ये फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत असतांना त्याला एक कथा सुचली तर त्याने ती त्याच्या मित्रांना ऐकवली. सर्व मित्रांना कथा खुप आवडली. नंतर लघूपट बनवण्याचा निर्णय त्यांनी घेतला.. त्याने त्याचे मित्र अक्षय संतोष महाजन व शुभम जगदीश लोहार यांच्यासोबत मिळुन सरदार जी.जी.हायस्कुलच्या मैदानावर खेळत असलेल्या काही मुलांचे निरीक्षण केल्यावर काही मुलांना स्क्रीन टेस्टसाठी बोलावले. सात मुलांमधून ऑडिशनमध्ये मनीष मानकर, यश सोनार व जयेश पाटील या तीन मुलांना लघूपटात घेण्यात आले. त्यानंतर 10 दिवस त्या मुलांना कॅमेर्‍यासमोर अ‍ॅक्टींग शिकवण्यात आली. या लघूपटाचे शुटींग डिसेंबर 2017 मध्ये रावेर शहराच्या जवळपास मंगरुळ व खानापूर येथे करण्यात आले. या लघूपटाचे छायांकन अजिंक्य डोळस्कर तसेच संवाद अक्षय महाजन आणि शुभम लोहार, ध्वनी रेका ॅर्डींग निमेश उडेशी, संगीत वैष्णवी श्रीराम, पोशाख प्रफुल पाटील यांनी दिले असून सहकलाकार हिमानी आनंद कुलकर्णी, नितीन भागवत महाजन आदींचा लघूपटात सहभाग आहे.