रावेरच्या आखाड्यात मध्यप्रदेशच्या मल्लांची हजेरी

0

दत्तजयंतीनिमित्त कुस्ती स्पर्धा ; विजेत्यांना आकर्षक बक्षीस

रावेर : दत्त जयंती यात्रोत्सवानिमित्त शहरतील कमलाबाई अग्रवाल महिला विद्यालयातील प्रांगणात बुधवारी झालेल्या कुस्त्यांच्या दंगलीत मध्यप्रदेशातील मल्लांनी हजेरी लावत पारितोषिक पटकावले. कुस्ती स्पर्धा उद्योजक श्रीराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली तर उद्घाटन आमदार हरीभाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भासपा उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रल्हाद पाटील, अमोल पाटील, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, पंचायत समिती सदस्य पी.के.महाजन, माजी नगरसेवक गणपत शिंदे, भाजपा तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे, नगरसेवक तथा आरोग्य सभापती सुरज चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सोपान पाटील, सुधीर पाटील, प्रकाश मुजुमदार, प्रकाश अग्रवाल, सुनील अग्रवाल, राजेंद्र महाजन, शे.सादिक, चंद्रकांत अग्रवाल, योगेश गजरे, अनिल पाटील, सुधाकर महाजन, अ‍ॅड.लक्ष्मीकांत शिंदे, गुणवंत सातव, संदीप सावळे, मुन्ना अग्रवाल, सचिन जाधव, राहुल चौधरी आदी उपस्थित होते. पंच म्हणून राधेश्याम पहेलवान, बापू पहेलवान, युसूफ पहेलवान यांनी काम पाहिले.