रावेर । रावेर शहरातील रहिवासी असलेली व सध्या एम.जे. कॉलेज येथे शिक्षण घेत असलेल्या कामिनी महाजन हिच्या सह तीन मुलींची राष्ट्रीय त्वायकांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. नुकत्याच एम.जे. कॉलेज येथे राज्यस्तरीय त्वायकांदो स्पर्धा संपन्न झाल्या. यामध्ये चार मुलींची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये कामिनी महाजन (रावेर), आश्विनी महाजन (जळगाव), श्रद्धा बुवा (जळगाव), विशाखा सपकाळे यांचा सहभाग असून पुढील राष्ट्रीय स्पर्धा पंजाब किंवा हरियाना येथे होणार आहे त्यांचे कोच म्हणून अजित गारगे, जीवन महाजन, जयेश बाविस्कर, बेलेसकर सर यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले खेळाडू कामिनी महाजन या रावेर शहरातील शिवाजी चौकाती रहीवासी असलेले शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष संतोष महाजन यांच्या कन्या असून चारही मुलींचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.