रावेरच्या नगरसेवकाचे दातृत्व : खड्डेमय रस्त्याला स्वःखर्चातून मुलामा

0

रावेर- शहरातील जिल्हा परीषद बांधकाम विभाग ते नवीन विश्रामगृहाकडे जाणार्‍या रस्त्यावर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांसह नागरीक त्रस्त झाले असताना शहराचे नगरसेवक अ‍ॅॅड.सुरज चौधरी यांनी पदरमोड करून या रस्त्यावरील खड्डे बुजवल्याने नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे. रावेर शहरात दाखल होण्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या जुना सावदा रोडवरील असलेल्या पुलाजवळ अनेक ठिकाणी मोठ-मोठ्ठी खड्डे पडले होते. या रस्त्यावर एक महाविद्यालय व एक कनिष्ठ महाविद्यालय असल्याने विद्यार्थी व परिसरातील नागरीकांना ये-जा करतांना खड्ड्यांमुळे मोठा मनस्ताप सोसावा लागत होता. नगरसेवक सुरज चौधरी यांनी स्व-खर्चाने डबर व मुरूम आणून रस्त्यावर पडलेले खड्डे बुजल्याने अनेकांनी चौधरी यांना धन्यवाद दिले. नगरसेवक सुधीर पाटील यांच्यासह परीसरातील नागरीक उपस्थित होते.