रावेर- शहरातील बेपत्ता इसलेल्या इसमाचा रावेर शिवारात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. 12 रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास सोपान गोविंदा मराठे (43, रा.शिवाजी चौक, रावेर) यांचा मृतदेह आढळला. मृत्यूचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता असल्याने रावेर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. अंबादास गोविंदा मराठे (भुसावळ) यांनी रावेर पोलिसात या प्रकरणी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक ओमप्रकाश सोनी करीत आहेत.