रावेर- गॅलरीतून पडल्यामुळे 20 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी येथे घडली. गांधी चौकातील प्रस्तावीत इस्लामपुरा भागातील शेख दानीश शेख माजीद (20) हा सोमवारी सकाळी 9.45 च्या सुमारास घरातील स्नानगृहात गेल्यानंतर त्यास मिरगी आल्यामुळे त्याचा पाय घसरून तो जमिनीवर पडला मात्र डोक्यात मार लागल्यानंतर तो बाहेर पडत असतानाच गॅलरीतून तोल गेल्याने खाली पडली. रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता त्यास मृत घोषित करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी अब्दुल रहमान शेख करीम यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस नाईक ओम प्रकाश करीत आहेत.