भुसावळ – मार्बलचा पकडलेला ट्रक सोडण्यासाठी दहा हजारांची लाच घेणार्या रावेर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्रविण निकाळजे यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर शनिवारी त्यांना भुसावळच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्या.डोरले यांच्या न्यायासनासमोर हजर केले असता 30 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. आरोपीतर्फे अॅड.सागर चित्रे, अॅड.जावेद मेमन, अॅड.सुरज चौधरी यांनी काम पाहिले.