रावेरच्या विवाहितेचा खून, पतीसह 11 आरोपी निर्दोष

0

भुसावळ :- विवाहितेला फाशी देऊन तिचा खून केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील पतीसह 11 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. 19 सप्टेंबर 2010 रोजी ही घटना घडली होती तर शबीनाबी शेख शकील या विवाहितेला ठार मारल्याचा आरोप होता. या प्रकरणी मयताचा भाऊ सैय्यद नजर सै.ईमाम (रावेर) यांनी फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल होता.

मंगळवारी न्या.प्रशांत क्षित्रे यांनी आरोपींविरुद्ध पुरावा सिद्ध न झाल्याने संशयाचा फायदा देत आरोपी सैय्यद शकील सै.छोटू, मुमताज बी., शहेनाज बी., सै.अजीज सै.छोटू, मजीज सै.छोटू, सै.अकिल, सै.ईकबाल, खालीदा बी., गुलनाज बी., रूकसारबी (सर्व रावेर), हिनाकौसर (कर्जोद) यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. आरोपीतर्फे अ‍ॅड.सागर चित्रे तर अ‍ॅड.जावेद मेमन यांनी काम पाहिले.