रावेर- शेती विषयक समस्या सोडविण्यासाठी रावेर तालुक्यातील शेतकर्यांनी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांना नेरीनजीक साकडे घातले. शेती विषयक पिकांसंदर्भात 14 प्रकारच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीसह कपाशी व मक्याचे पीक घेतले जाते परंतु मागील तीन ते चार महिन्यांपासून वादळी पावसाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना तालुक्यातील शेतकर्यांनी निवेदन देऊन अडचणी सोडवण्याची मागणी केली. यावेळी माजी आमदार अरुण पाटील, बाजार समिती सभापती तथा राष्टवादी तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, मेहमूद शेख पांडुरंग पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संखने उपस्थित होते.