रावेर- रावेरच्या दिशेने भरधाव वेगाने येणार्या आयशर गाडीवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती लिंबाच्या झाडाला धडक व शॉर्टसर्किट होवून आयशर गाडी जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. मध्यप्रदेशातील बर्हाणपूरकडून रावेरच्या दिशेने रात्री दिडच्या सुमारास भरधाव वेगाने येणार्या आयशर गाडी (एम.एच.04 एफ.जे.6668) वरील चालक इरफान शाहद मिर (रा.खैराती बाजार, बर्हाणपूर) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने ती कर्जोत (ता.रावेर) गावाच्या पुढे जंगली पीर रस्त्याच्या बाजुला असलेल्या निंबाचे झाडाला धडकला व त्यानंतर शॉर्टर्किट झाल्याने वाहनाला आग लागली.या नुकसानीला वाहन चालक जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध रावेर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश चौधरी करीत आहेत.