रावेर- भरधाव वेगातील अज्ञात ट्रकने धडक दिल्याने मध्यप्रदेशातील बर्हाणपूरच्या लालबाग भागातील दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना 3 जानेवारीच्या रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. सुरज नारायण चंदवाणी (28) असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे. रावेर-बर्हाणपूर रस्त्यावरील भाऊच्या ढाब्या जवळ अज्ञात ट्रकने दुचाकी (एम.एच.28 यू.5688) ला धडक दिल्याने दुचाकीस्वार सुरज नारायण चंदवाणी (28) हा जागीच ठार झाला तर त्याचा जोडीदार निलेश श्रीराम गोवे हा गंभीर जखमी झाला. निलेश गोवे याने फिर्याद दिल्यावरून रावेर पोलीस स्टेशनला अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पालधे व पोलिस कर्मचारी करीत आहेत.