रावेर- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळील पी.ई.तात्या मार्केमधील अनिल सुपारी भांडाराचे कुलूप तोडून चोरट्यांनी वीडीचे खोके चोरीला गेल्याने रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी अमय टायर्स आणि प्रसाद इलेक्ट्रिक दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा मार्ग काढत आरोपी जावेद मुबारक तडवी (रावेर) याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या ताब्यातून दोन वीडीचे खोके पोलिसांनी जप्त केले आहेत. रावेरचे पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ईस्माईल शेख, विकास पोहेकर, बारात सुपे, गणेश रोहिल, म्हस्के यांनी गोपनीच्या माहितीच्या आधारे आरोपीच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या माहितीनुसार जावेद हा अनिल सुपारी भांडारवर कामाला होता शिवाय यापर्वूीही त्याने दोन ते तीन वेळा किरकोळ चोरी केल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.