रावेरमध्ये चिमुरड्यांनी जाणले पोलिसांचे कामकाज

0
रावेर : पोलीस ठाण्यातील कामकाज कसे चालते, नेमक्या काय तक्रारी येथे दाखल होतात वा पोलिसांच्या कामकाजाची नेमकी कार्यपद्धत्ती काय आहे ? याबाबत रावेर शहरातील चिमुरड्यांना बालदिनानिमित्त मार्गदर्शन करण्यात आली. सिनेमाच्या पडद्यावरुन दिसणारे पोलीस व प्रत्यक्षात खर्‍या खुर्‍या पोलिसांचा रुबाब व कार्यपद्धत्ती पाहून विद्यार्थी भारावले तसेच त्यांना त्यांच्यातील माणुसकीचेदेखील दर्शन घडले.
मंगळवारी बाल दिनानिमित्त शहरातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी रावेर पोलीस ठाण्याला भेट दिली.  तक्रार कशी घेतली जाते, जेलमध्ये कुठले आरोपी आहेत, सीसीटीएनएस प्रणाली म्हणजे नेमके, पोलीस ठाणे अंमलदाराचे कार्य कसे असते या शिवाय पोलिसांकडील शस्त्र तसेच पोलीस ठाण्यात कार्यरत अधिकार्‍यांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. फौजदार निकाळजे, कॉन्स्टेबल जितेंद्र पाटिल, कॉन्स्टेबल राहुल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करीत त्यांच्या शंकांचे निरसन करीत माहिती दिली. शहरातील कमलाबाई, सरदार जी.जी.हायस्कूल, यशवंत विद्यालय, स्वामी विवेकानंदच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.