रावेर- शहरातील सखी श्रृंगार जनरल स्टोअर्समध्ये चोरी केल्याप्रकरणी रावेर पोलिसांनी अट्टल घरफोड्याला अटक केली आहे. 14 सप्टेंबरच्या रात्री छोरीया मार्केट मधील सखी श्रृंगार जनरल स्टोअर्सचे शटर वाकवून चोरट्याने गल्ल्यातील दोन हजार 700 रुपये रोख पाकिट व कागदपत्रे लांबवली होती. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढली असता गुप्त माहितीच्या आधारावर निंबोल येथून गोंडु कोळी यास ताब्यात घेतले असता त्याने पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर चोरीची कबुली दिली. आरोपीने निंभोरा हद्दीतही चोरी केल्याचे सांगितले. आरोपी गुन्हा करण्यासाठी वापरलेली लोखंडी टॉमी व चोरी केलेले दोन हजार 500 रुपये काढून दिले. कॉन्स्टेबल बिजू जावरे, नाईक ओमप्रकाश सोनी, विलास तायडे, सुरेश मेढे यांनी परीश्रम घेतले.