चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळ : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
रावेर (शालिक महाजन)- शहरातील आशु बेकरीत टोस्टला कृत्रिम गोडवा निर्माण करण्यासाठी सॅक्रीनचा अधिक वापर केल्याप्रकरणी बेकरी चालकास 15 हजार रुपये दंड सुनावण्यात आा. अन्न प्रशासन विभागाच्या सह आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे शहरातील बेकरी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वर्षभरापूर्वी झाली होती तपासणी
शहरातील स्टेशन रोडवरील आशिष बेकरीत अन्न प्रशासनाच्या टीमने वर्षभरार्वी छापा टाकला होता. यात टोस्ट, ब्रेड, लादीपाव तपासणीसाठी ताब्यात घेतले होते. त्याचे नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले असता त्यात गरजेपेक्षा जास्त सॅक्रिनचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. सॅक्रिन ही शरीराला हानीकारक असल्याने नाशिक येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त उदय वंजारी यांनी आशु बेकरी चालकाला 15 हजार रुपये दंड सुनावला.
सॅक्रिनचा वारेमान वापर भोवला
अन्न व औषध प्रशासनाच्या टीमने रावेरात आशु बेकरीची तपासणी केली होती लॅबमधून आलेल्या अहवालात गरजेपेक्षा जास्त सॅक्रिन टाकल्याने सहाय्यक आयुक्त यांनी 15 हजाराचा दंड केले केला असल्याचे रावेरचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक अनिल गुजर यांनी ‘दैनिक जनशक्ती’ला सांगितले
दोषी बेकरी चालकांवर कारवाई हवी
लहान मुलांना टोस्ट मोठ्या प्रमाणावर आवडतात मात्र झटपट मालामाल होण्यासाठी बेकरीचालक नागरीकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. नागरीकांच्या आरोग्याशी खेळणार्या शहरातील अशा बेकर्यांना कायमस्वरूपी कुलूप ठोकावे, अशी मागणी आता पुढे आली आहे.