रावेर- शहरातील जयभोले ढाब्यासमोर गावठी दारू विक्री करताना आरोपी अरविंद गोविंदा पाटील (रा.केर्हाळे) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यतून 260 रुपयांची डिप्लोमा व्हिस्की, 600 रुपये किंमतीची मॅक्डोल व्हिस्की, 624 रुपये किंमतीच्या देशी बॉबी दारूच्या बाटल्या , 624 रुपये किंमतीच्या देशी टँगोच्या बाटल्या मिळून दोन हजार हजार 108 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक, एएसआय गफूर तडवी, भागवत धांडे, तुषार मोरे, निलेश चौधरी, उमेश नरवाडे आदींच्या पथकाने केली. तपास हवालदार सतीश सानप करीत आहेत.