सायंकाळी ५ वाजेपर्यंत जळगावमध्ये ५२ तर रावेरमध्ये ५६ टक्के मतदान !

0

जळगाव । १७ व्या लोकसभेसाठी आज (दि.23) रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. जळगाव व रावेर मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. सायंकाळी ५ वाजेपर्यंत रावेर लोकसभा मतदार संघात ५६.८३ तर जळगाव लोकसभा मतदारसंघात ५२.२४ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर उन्हाची पर्वा न करता अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा कायम होत्या. जळगाव लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील विरूध्द महाआघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांच्यात लढत असून, एकूण १४ उमेदवार रिंगणात आहेत. रावेर लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे विरूध्द महाआघाडीचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यात लढत असून, एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान (रावेर)
चोपडा – 57.14%
रावेर-यावल – 62.01%
भुसावळ – 48.87%
जामनेर – 55.07%
मुक्ताईनगर – 57.56 %
मलकापूर – 60.99 %

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान (जळगाव)
जळगाव शहर – 45.48%
जळगाव ग्रामीण – 56.36%
अमळनेर – 49.77%
पारोळा-एरंडोल – 55.76%
चाळीसगाव – 53.89%
पाचोरा-भडगाव – 53.94%