आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसल्याने आकाशात फुगे सोडून केला निषेध
रावेर- भाजपा केंद्र व राज्य सरकारने जनतेला आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसल्याच्या निषेधार्थ शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आश्वासनांचे फुगे आकाशात सोडून सरकारचा निषेध करण्यात आला तसेच तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करून सरकारविरुध्द घोषणाबाजी करण्यात आली.
यांचा आंदोलनात सहभाग
धरणे आंदोलन माजी आमदार अरुण पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष तथा बाजार समिती सभापती नीळकंठ चौधरी, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनील कोंडे,सेवा दलचे प्रकाश पाटील पंचायत समिती सदस्य योगेश पाटील दीपक पाटील, विनोद चौधरी, प्रल्हाद बोंडे, कार्याध्यक्ष विलास ताठे, राजेंद्र चौधरी, समाधान साबळे, संतोष पाटील, अनिल आसेकर, दिलरुबाब तडवी, शहराध्यक्ष मेहमूद शेख, गोपाळ चौधरी, मायाबाई बारी, महेंद्र बारी, लक्ष्मण मोपारी, ईश्वर पाटील आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.