रावेरमध्ये सणांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

0

रावेर- मोहरम व गणेश विसर्जन विसर्जनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस प्रशासनातर्फे मंगळवारी शहरातील विविध भागातून पोलिसांनी रूट मार्च केला. चौराहा, नागझिरी, थडा भाग मेन, रोड शिवाजी चौक, गांधी चौक, भोईवाडा चौक आदी भागातून सशस्त्र पोलिसांनी रूट मार्च करीत नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण केली. पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक निरीक्षक शिवाजी पाळदे ,फौजदार दीपक ढोमणे यांच्यासह एसआरपी प्लाटून, आरसीपी प्लाटून, रावेर पोलिस स्टेशनचे कर्मचारीव होमगार्ड सहभागी झाले.