रावेरला उपजिल्हा रुग्णालय होण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर

0

डॉ.चव्हाण ; सर्व रोग निदान शिबिरात 520 रुग्णांची तपासणी

रावेर:- रावेर येथील रूग्ण संख्या लक्षात घेता या ठिकाणी 100 खाटांचे रुग्णालय व्हावे म्हणून प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण यांनी सांगून शासकीय आरोग्य सेवांचा लाभ नागरीकांनी घ्यावा, असे आवाहन देखील त्यांनी केले. ग्रामीण रुग्णालयात आयोजित सर्वरोग निदान शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा उज्वला पाटील होत्या. प्रतिमा पूजन सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, यांनी केले. दीपप्रज्वालन जिल्हा शल्य चिकित्सक नागोराव चव्हाण, नगराध्यक्ष दारा मोहम्मद यांच्या हस्ते करण्यात आले. पंचायत समिती वानखेडे, रुग्ण कल्याण समितीचे पद्माकर महाजन, दीपक नगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

तज्ज्ञ डॉक्टरांची हवी सेवा
प्रास्ताविकात वैद्यकिय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांनी रुग्णालयाची वाटचाल आणि यात असलेल्या सुविधा या विषयी माहिती दिली. दीपक नगरे यांनी रुग्णालयातील सुविधा अधिक बळकट होऊन कर्मचारी संख्या वाढविण्याची मागणी केली. पद्माकर महाजन यांनीदेखील ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी यांचे कौतुक करून इतर तज्ञ डॉक्टर यांची सेवा मिळावी म्हणून अपेक्षा व्यक्त केली. पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे यांनी बेटी बचाव मोहीम बाबत सांगून सुरक्षित बाळंतपण होण्यासाठी महिलांनी शासकीय रुग्णालयात येण्याचे आवाहन केले आहे.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.संदीप चौधरी, डॉ.संदीप पाटील, डॉ.मनोज पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.गुरुदत्त वाघ, डॉ.चंद्रदीप पाटील, डॉ.मोहिनी तायडे, डॉ.पूनम भोगे, डॉ.आरती काळसकर, डॉ.रिजवाना शेख, डॉ.तोडकर, डॉ.प्रशांत पाटील, सर्व डॉक्टर, अधिपरीचारिका कल्पना नगरे, मंगला वळवी, लता कोल्हे, पूनम चौधरी, अर्चना पाटील, कार्यालय अधीक्षक वाय.टी.महाजन यांच्यासह सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रदीप काळे, आभार डॉ.दीपक सोलंकी यांनी मानले.