कायम ग्रेडरच्या नियुक्तीसाठी प्रयत्न करणार -आमदार शिरीष चौधरी
रावेर : तालुक्यातील शेतकर्यांनी शासनाच्या हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा तसेच कापूस खरेदीसाठी लागणार्या कायम ग्रेडर अधिकार्याच्या नियुक्तीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून अद्याप ऑनलाइन नोंदणी बाकी असलेल्या शेतकर्यांनी या योजनेचा जास्तीत-जास्त लाभ घेण्याचे आवाहन आमदार शिरीष चौधरी यांनी सोमवारी कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी केले. सीसीआयतर्फे बर्हाणपूर रस्त्यावरील श्री गणेश जिनिग प्रेसिंग फॅक्टरीत मान्यवरांच्या उपस्थितीत खरेदी केंद्राचे उद्घाटन झाले. प्रसंगी आमदार बोलत होते. प्रसंगी प्रति क्विंटल पाच हजार 450 रुपये भाव कापसाला जाहीर करण्यात आला.
कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
कापूस खरेदी केंद्राचा सोमवारी मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी रवींद्र महाजन या शेतकर्याकडील कापसाची पहिल्या दिवशी खरेदी करण्यात आली. याप्रसंगी माजी आमदार अरुण पाटील, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन यांनी मार्गदर्शन केले. उपसभापती उस्मान तडवी, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, तुकाराम बोरोवले, माजी नगराध्यक्ष रमेश महाजन, व्यापारी अनिल अग्रवाल, संचालक गोपाळ नेमाडे, प्रमोद धनके, डी.सी.पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, योगेश पाटील, सुभाष पाटील, विनोद पाटील, शिवाजीराव पाटील, गोंडू महाजन, सूर्यभान चौधरी, रवींद्र महाजन, मोपारी, ग्रेडर गणेश कराळे, बाजार समिती सचिव गोपाळ महाजन, शेतकरी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दोनशे शेतकर्यांची ऑनलाइन नोंदणी
आतापर्यंत 200 शेतकर्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी झाली केली आहे. सीसीआयच्या माध्यमातून कापसाला पाच हजार 450 भाव निश्चित करण्यात आला आहे. यासाठी शेतकर्यांनी सातबारा उतारा, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड आणावे तसेच 12 टक्के आर्द्रता गेल्यास कापूस खरेदी करण्यात येणार नाही, असेही कळवण्यात आले आहे.