रावेर– घरातील कमवती व्यक्ती गेल्यास कुटुंबावर कोसळणार्या दुखःच्या सावटातून सावरण्यासाठी कार्यकर्त्यांनी अश्या व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन संजय गांधी योजना समिती अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी रावेर तहसील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. कुटुंब सहाय्य योजनेंतर्गत 43 लाभार्थीना धनादेश वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती माधुरी नेमाडे, उपसभापती अनिता चौधरी, माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा परीषद सदस्य आत्माराम कोळी, कैलास सरोदे, अमोल पाटील, पंचायत समिती सदस्य योगीता कोळी, जुम्मा तडवी, नगरसेविका शारदा चौधरी, स्वाती चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, महेश चौधरी, संदीप सावळे, विजय चौधरी, तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे, यशवंत अप्पा पाटील, अहमद तडवी, दुर्गादास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यांनी घेतले परीश्रम
प्रास्ताविकात तहसीलदार विजय ढगे यांनी वृध्द व्यक्ती, अपंग, आणि गरीब व निराधार यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. तर कुटुंब अर्थ साहाय्य योजनेची माहिती देत त्याचे निकष देखील स्पष्ट केले. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे यांनी वृक्षारोपण, ग्रीन आर्मी सदस्य नोंदणी आणि जंगलात लागणारी आग त्याच्या वणव्याने होणारे नुकसान याविषयी माहिती देत नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. पद्माकर महाजन यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, कुटुंबातील आधार गेल्यावर त्याची भरपाई कोणीही करू शकत नाही पण शासनाच्या योजनेची मदत देखील आपल्या सहकार्यासाठी आहे. माधुरी नेमाडे यांनी देखील महिलांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात 43 व्यक्तींना धनादेश वितरित करण्यात आले. सूत्र संचालन नगरे यांनी केले तर आभार संगीता घोंगडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नायब तहसीलदार सी एच पाटील, आर पी भावसार यांच्यासह अरुण वसावे, मनोज लडके, शरीफ तडवी, अकबर तडवी, सत्तार खा, संतोष महाजन, श्री गोटीवाले, शिव कुमार लोलपे यांच्यासह कर्मचारी तलाठी , मंडळाधिकारी यांनी परीश्रम घेतले.