विशाल कुंभार व अनिता भिलाला ठरली विजेता
रावेर- अंबिका व्यायाम शाळेतर्फे जिल्हास्तरीय भव्य मॅरेथॉन स्पधेचे उद्घाटन हिरवी झेंडी दाखवून तहसीलदार विजय ढगे यांनी केले. 40 वर्ष वयोगटावरील स्पर्धकांसाठी पाच किलोमीटर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथमच 9 मुलींनी सहभाग नोंदविला. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील स्पर्धकांनी सहभाग घेतला. 40 वर्ष आतील स्पर्धकांसाठी ही स्पर्धा अंबिका व्यायाम शाळेपासून बर्हाणपूर रोडने जंगली पीरपर्यंत 10 किलोमीटर धावण्याची ही स्पर्धा होती. विजेत्यांना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. स्पर्धेत 130 स्पर्धकांनी प्रत्यक्ष भाग घेतला.
यांची होती उपस्थिती
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पदमाकर महाजन, तहसीलदार विजयकुमार ढगे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, प्रकाश मुजूमदार, डॉ.रवींद्र वानखेडे, अॅड.एम.ए.खान, सुधाकर महाजन, शिरीष वाणी, तालुका सरचिटणीस वासुदेव नरवाडे, डॉ.गुलाब पाटील, लखम पटेल, अॅड.लक्ष्मण शिंदे, प्रल्हाद पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, मुन्ना अग्रवाल, शैलेश अग्रवाल, अमोल पाटील, कालू बारी, अनिल चौधरी, हेमंत नाईक, भगवान महाजन यांच्यासह अंबिका व्यायामशाळेचे खेळाडू, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचलन ई.जे.महाजन यांनी तर आभार भास्कर महाजन यांनी मानले.
यांनी परीश्रम घेतले
अंबिका व्यायाम शाळेचे अध्यक्ष भास्कर महाजन, रवींद्र महाजन, अशोक पाटील, भगवान चौधरी, योगेश प्रजापती, रवींद्र पाटील, विकास देशमुख, संतोष चौधरी, भुषण चौधरी, नथ्थू महाजन, अॅड.तुषार माळी, जितेंद्र पाटील व कार्यकर्त्यांनी परीरश्रम घेतले.
स्पर्धेतील विजेते असे – दहा किलोमीटर- प्रथम- विशाल कुंभार (डांभूर्णी), द्वितीय- आशिष पटेल (भोपाळ), तृतीय- भगतसिंग रामसिंग (मुक्ताईनगर), पाच किलोमीटर- प्रथम- अमित धनराज बागळे (रावेर), द्वितीय- वसंत प्रभाकर गवंदे (रावेर), तृतीय- युवराज रामभाऊ सुशीर (रावेर) तर दहा किलोमीटर, मुली- प्रथम- अनिता तेरसिंग भिलाला (यावल), द्वितीय- वेदिका हरीरश्चंद्र मंडलिक तर सिंड्रीला डॅनिल पवार (भुसावळ) ही तृतीय आली.