शुक्रवारचा मोर्चा रद्द ; प्रति क्विंटल दोन हजार 400 रुपयांचा मिळाला भाव
रावेर- शहरात ज्वारी खरेदी केंद्राला सुरुवात झाली असून शुक्रवारचा मोर्चा यानिमित्त रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे युवा नेते तथा नगरसेवक राजेश वानखेडे यांच्यासह जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील व सहकार्यांनी 26 रोजी दुपारी तहसीलदार कविता देशमुख यांना निवेदन दिले होते. 1 नोव्हेंबरपासून ज्वारी खरेदी केंद्राला सुरुवात झाली असून ज्वारीला दोन हजार 400 रुपये भाव जाहीर करण्यात आला आहे. खरेदी केंद्राबाबत वानखेडे यांना तहसीलदारांनी पत्र दिले आहे.