रावेरला दंगलीत एकाचा मृत्यू ; दोन दिवसांसाठी संचारबंदी

0

दंगलप्रकरणी दोन्ही गटाच्या 500 जणांविरोधात गुन्हा दाखल ; विशेष पोलीस महानिरिक्षकांकडून पाहणी, घेतला आढावा

जळगाव: शासनातर्फे जनता कर्फ्यूचे आदेश लागू असतांना रस्त्यावर गर्दी केल्याच्या कारणावरुन दोन गटात दंगल झाल्याची घटना 22 रोजी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास रावेर शहरात शिवाजी चौकात घडली. दोन्ही गटांच्या जमावाकडून नियंत्रण मिळविणार्‍या पोलिसांवर दगड, विटा, काचेच्या बाटल्यांचा वापर करण्यात आल्याने पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. यादरम्यान खाजगी वाहने जाळण्यात येवून पोलिसांचे वाहने, इलेक्ट्रीक डी.पी. तोडफोड करुन नुकसान करण्यात आले. याप्रकरणी दोन्ही गटाच्या 300 ते 400 पेक्षा जास्त लोकांविरोधात रावेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दंगलीत जखमी यशवंत काशीराम मराठे एकाचा उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला आहे. शहरात दोन दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोमवारी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक छेरींगे दोरजे यांची भेट दिली होती.

अधिकारी होते तळ ठोकुन

पोलीस अधिक्षक पंजाबराव उगले, अप्पर अधिक्षक भाग्यश्री नवटके , प्रांताधिकारी अजित थोरबोले, तहसिलदार उषाराणी देवगुणे, डिवायएसपी नरेंद पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे श्री रोहन, विशेष शाखेचे श्री भागवत, सपोनि शितल कुमार नाईक, राहूल वाघ (सावदा) , महेश जानकार (निंभोरा) उपनिरीक्षक सुनिल कदम, मनोज वाहमारे,योगेश शिंदे यांचे सह सावदा, निंभोरा, मुक्ताईनगर , फैजपुर, यावल, वरणगाव, भुसावळ येथील पोलीस व दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

दोन्ही गटाच्या विरोधात परस्पर तक्रारीवरुन गुन्हे

पहिल्या गटातर्फे अशोक प्रल्हाद महाजन वय 55 रा. शिवाजी चौक रावेर यांच्या फिर्यादीवरुन इल्या याकुब चौधरी मन्सुर इब्राहीम खान, ईस्माईल इब्राहीम खान, मुस्ताक दुंड्या, शेख कालू शेख नुसार, शेख इम्रान शेख इलीयास, जमील भांडेवाला, नसिरखान इसाकखान, इरफान खान भिकन खान, इसाक खान इब्राहीम खान उर्फ भुर्‍या, दस्तगरी शेख कालू, शेख मुजाहीद शेख इरफान, शेख अकील शेख सुपडू, आबीद खान इब्राहीम खान, बाबुखान उर्फ शरीफखान भिकन खान, जुबेर खान इसाक खान व त्यांच्यासोबत दीडशे ते 200 जण सर्व रा. रावेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 2 तर दुसर्‍या गटातर्फे शेख जमील शेख बनेसाहब वय 56 रावेर यांच्या फिर्यादीवरुन सुरेश सोनू शिंदे, गणेश हरचंद महाजन, पिंटू मुक्तानंद दानी, प्रशांत गंगाधर दानी, निलेश यशवंत शिंदे, पवन चिंतामण अस्वार, बापू धनू अस्वार, गणेश जगन्नाथ बारी, श्रीकांत मोहन बारी, भास्कर जगन्नाथ बारी, योगेश चौधरी यांच्यासह 150 ते 200 जण रा. शिवाजी चौक रा. रावेर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांवर जमावाचा हल्ला, वाहनाची तोडफोड; 15 जण ताब्यात

दोन्ही गटात तुंबळ हाणामारीच्या घटनेची माहिती मिळाल्यावर नियंत्रणासाठी गेलेल्या पोलिस कर्मचार्‍यांवर जमावाने दगड, विटा, काचेच्या बाटल्या मारुन फेकत जीवघेणा हल्ला केला. तसेच पोलिसांना न जुमानता खाजगी वाहने जाळून तसेच पोलीस वाहनाचेही तोडफोड करत शासकीय मालमत्ताचे नुकसान केले. जमावाच्या हल्लयात पोलीस कर्मचार्‍यांच्या हाताला, पायाला, डोक्याला तसेच पाठीवर जबर मार लागून गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार जयवंतराव नाईक वय 35 यांच्या फिर्याद दिली असून मन्सुर इब्राहीम खान, इब्राहीम खान, मुस्ताक दंड्या, शेख इम्राण शे. इलियास, जमील बरतनवाला, नसिरखान इसाकखान, इरफानखान भिकनखान, इसाकखान इब्राहीम खान उर्फ भुर्‍या, आबीदखान इब्राहीम खान, इस्माईल खान इब्राहीमखान, बाबुखान उर्फ शरीफखान भिकनखान, जुबेरखान इसाकखान, शे.कालू शे.नुरा, दस्तगीर शेख कालू, इल्या याकूब चौधरी, शे.मुजाहीद शेख इरफान, शेख अकील शेख सुपडू तसेच सुरेश सोनू शिंदे, गणेश हरचंद महाजन, पिंटू मुक्तानंद दानी, प्रशांत दाणी, निलेश यशवंत शिंदे, पवन चिंतामण अस्वार, बापू धन अस्वार, गणेश जगन्नाथ बारी, श्रीकांत मोहन बारी, भास्कर जगन्नाथ बारी, राजेंद्र शिंदे रा. शिवाजीचौक यांच्यासह 350 ते 400 जणांविरोधात कलम 307, 353, 435, 427, 143,147, 148, 149, सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंध कायदा 1984 चे कलम 3 क्रिमीनल लॉ अमेन्डमेंट अ‍ॅक्ट 1932 कलम 3, 7 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 1951 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही गटाच्या 15 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मयत यशंवत मराठेंवर अंत्यसंस्कार

येथील दंगलील मयत झालेला यशवंत मराठे यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात शवच्छदन करून त्यांचे पोलिस बंन्दोबस्ता अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या नातलकांनी एकच आक्रोश करीत मयत मराठेंच्या मारेकरांना सोडू नका असे म्हणून प्रचंड आक्रोश केला

दंगल पूर्व नियोजित

रावेर शहरात झालेली दंगल पूर्व नियोजित होती जागेवर दगडांचा खच पडलेला होता तसेच खाली दारूच्या बाटल्यांमध्ये पेट्रोल टाकून जाळपोळ सुध्दा करण्यात आली होते यामध्ये पाच मोटर सायकल एक मेनिटोर व बाकीच्या वाहनांची तोडफोड् करण्यात आली आहे

दंगलीत दुसर्‍यांदा महिलेच्या घरावर हल्ला

दरम्यान येथील संभाजी चौकातील विधवा शोभाबाई महाजन यांच्यावर घरावर दंगेखोरांनी हल्ला केला घरातील सामानाची नासधुस केली याच शोभाबाई महाजन यांच्या घरावर 24 डिसेंबर 2012 ला झलेल्या जातीय दंगलीत सुध्दा त्यांच्या घराची नासधुस झाली होती याची पूर्णवृत्ती आज झाली या घटनेचा वृत्तांची सांगतांना शोभाबाई महाजन प्रचंड भावनिक झाल्या होत्या.