रावेर- शहरातील स्टेशन रोडवरील घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 58 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. या प्रकरणी पंकज चंद्रकांत बडगुजर (32, नोकरी रा.लक्ष्मी नगर, गट नंबर 79, प्लॉट नंबर 21, स्टेशन रोड, रावेर) यांनी रावेर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बडगुजर हे कुटुंबासह गावाला गेल्याने 26 ते 28 ऑगस्ट दरम्यान घराला कुलूप हाते. चोरट्यांनी दर्शनी भागाच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत कपाटातील सात हजारांच्या रोकडसह 15 हजार रुपये किंमतीचे पाच ग्रॅमचे कानातले, 15 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅमची सोन्याची चैन, 12 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, तीन हजार 200 रुपये किंमतीचे पायातील पैंजण, दोन हजार 500 रुपये किंमतीचे जोडवे, दोन हजार रुपये किंमतीची चांदीची समयी, एक हजार 500 रुपये किंमतीची बेडी असा एकूण 58 हजार 200 रुपयांचा ऐवज लांबवण्यात आला. तपास हवालदार ईस्माईल शेख करीत आहेत.