रावेर । महात्मा ज्योतिबा फुले ‘जनआरोग्य योजना’ वाढीव तरतुदीनुसार लागू करुन नविन आरोग्य पत्र मिळवे या मागणीसाठी खान्देश माळी महासंघातर्फे तहसिल कार्यालयासमोर बुधवार 28 रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या बाबतचे निवासी नायब तहसिदार सी.एच. पाटील यांनी स्विकारून एक दिवशीय धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली. या आंदोलनास सर्वपक्षीयांनी पाठींबा दर्शविला.
वेळोवेळी मागणी करुनही मंजुरी मिळेना
याप्रसंगी पोलीस निरिक्षक नरेंद्र पिंगळे उपस्थित होते. खान्देश माळी महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा शकुंतला महाजन, मागदर्शक कांतीलाल महाजन, तालुकाध्यक्ष पिंटू महाजन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन संपन्न झाले. हजारो गरजू रुग्णांच्या उपचारासाठी ’महात्मा फुले जनआरोग्य योजना’ वाढीव तरतुदीनुसार त्वरित लागू करावी. तसेच या योजनेचे नविन आरोग्यपत्र वाटप करावी. यासाठी शासनाकडे वेळोवेळी मांगणी केली. मात्र यावर अद्यापही कार्यवाही झाली नाही या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रावेर तालुका खान्देश माळी महासंघातर्फे 1 दिवसीय धरणे आंंदोलन तहसिल कार्यालयासमोर झाले. यावेळी खान्देश माळी महासंघाचे पदाधिकारी रामकृष्ण महाजन, प्रकाश महाजन, शामराव चौधरी, गणेश फुलमाळी, सिताराम महाजन, पुष्पा महाजन, मिनाक्षी मानकर, आकाश महाजन, ज्ञानेश्वर महाजन उपस्थित होते. या धरणे आंदोलनला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सोपान पाटील, नगरसेवक अॅड सुरज चौधरी, नगरसेविका शारदा चौधरी, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, भारिप महासंघ बाळू शिरतुरे साहित्यिक काशिनाथ चौधरी, यांनी पाठींबा दिला.