छायाचित्रकारांनी दिली पत्रकार परीषदेत माहिती
रावेर- रावेर तालुका फोटोग्राफर बहुउद्देशीय असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने फोटोग्राफी दिनानिमित्त 18 ऑगस्ट रोजी आंतरराज्यीय स्टुडीओ लाईटींग वर्कशॉप या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. राज्या-परराज्यातील फोटोग्राफरांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोमवारी झालेल्या पत्रकार परीषदेत रावेरच्या छायाचित्रकारांनी केले आहे. नवीन विश्रामगृहावर या संदर्भात पत्रकार परीषद घेण्यात आली. फोटोग्राफी दिनानिमित्त बुलढाणा येथील प्रख्यात फोटोग्राफर सुनील बोर्डे यांचे स्टुडीओ लाईटींग वर्कशॉप या विषयावर मार्गदर्शनपर कार्यशाळा 18 रोजी होणार आहे तर 19 रोजी फोटोग्राफर असोसिएशनर्फे रावेर शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. त्यात समाज प्रबोधनात्मक संदेश देण्यात येणार आहे
यांची होती उपस्थिती
या पत्रकार परीषदेला रावेर तालुका फोटोग्राफर बहुउद्देशीय असोसिएशनचे अध्यक्ष गणेश महाजन, उपाध्यक्ष सुनील महाजन, सचिव योगेश नन्नवरे, सहसचिव गजानन चौधरी, सदस्य तुषार मानकर, मनोज पाटील, गोकूळ महाजन, चंद्रकांत पाटील, यशपाल परदेशी, आकाश भालेराव, मयूर पाटील, संजय महाजन, उमेश कोळी, शरद महाजन, राहुल महाजन, प्रवीण पाटील, शेख इमरान आदींची उपस्थिती होती.