रावेर : रावेरसह पाल भागात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ थांबायला तयार नाही. पाल तलाठी गुणवंत बारेला हे अवैधरीत्या वाळू वाहतुकीकडे जाजणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने पर्यावरणप्रेमी संतप्त झाले आहेत. अवैध वाळू वाहतुकीकडे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
पहाटेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक
रावेर तालुक्यातील सुकी नदी व भोकर नदी पात्रातून पहाटे चार ते सातच्या दरम्यान नदी पात्रात अवैधरीत्या ट्रॅक्टर उतरवून सर्रासरीत्या अवैध वाळूची वाहतूक करतात. या वाळू चोरट्यांना महसूल प्रशासनाचे छुपे अभय असल्याने त्यांची हिंमत वाढली असून पाल तलाठी यांच्या दुर्लक्षामुळे येथून मोठ्या प्रमाणात सुकी नदीची वाळू अवैधरित्या रावेर शहरात येऊन चढ्याभावाने विक्री होत आहे. या संदर्भात पाल तलाठी गुणवंत बारेला यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ही बाब फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी गांभीर्यपूर्वक घेवून कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.