रावेरसह मुक्ताईनगरात नवीन वाहनांमुळे गुन्हेगारीला आळा

नवीन पोलिस वाहनांमुळे गस्त होणार नियमित : पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने जीप दाखल

रावेर : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पोलिस दलासाठी मंजूर करण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचा ताफा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारी सुपूर्द करण्यात आला. यात 14 चारचाकी वाहनांचा समावेश होता तर उर्वरीत 15 वाहने व 70 दुचाकी दोन-तीन महिन्यात पोलीस दलात दाखल होतील. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विनंतीनुसार मुक्ताईनगर पोलिसस स्टेशनला एक तर रावेर पालिस ठाण्यासाठी एक नवीन चारचाकी वाहन 6 एप्रिल रोजी उपलब्ध झाले. नवीन वाहनाचे आमदार पाटील यांच्या हस्ते लोकार्पण व पूजन करण्यात आले.

मुक्ताईनगरात यांची होती उपस्थिती
यावेळी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक निलेश सोळुंके, शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, शेमळदे माजी सरपंच दिलीप पाटील, नगरसेवक तथा गटनेते राजु हिवराळे, माजी उपतालुका प्रमुख प्रशांत भालशंकर, शिवसेना विभाग प्रमुख महेंद्र मोंढाळे आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन वाहनांमुळे गस्त होणार सुलभ
पोलिसांच्या तुलनेत दुचाकी आणि चार चाकी वाहनांची संख्याही खूप कमी असल्याने पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांची प्रचंड दमछाक होत असून त्यातच सध्याची वाहने जुनी असल्याने त्यांची वारंवार करण्यात येणारी डागडुजी, इंजिन दुरुस्ती डोकेदुखी ठरत होती. या समस्यांचे गार्‍हाणे पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मांडले त्यानुसार याची घेऊन जळगांव जिल्हा पोलिस दलासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली. जिल्हा नियोजन समितीमार्फत वाहनांची खरेदी झाल्याने 29 पैकी 14 नवीन वाहनांचा ताफा शुक्रवारी दाखल झाला. व जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनला वितरीत करण्यात आला. यातीलच एक नवीन चारचाकी वाहन मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मागणीनुसार प्राप्त झाली. या वाहनाचे पूजन व लोकार्पण आमदार चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांनी केले.

रावेर पोलिसांना बोलेरो कार प्राप्त
रावेर : रावेर पोलिस स्टेशनला नविन बोलेरो कार प्राप्त झाली आहे. चोख कायदा-सुव्यस्था हाताणनारे पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे यांना या नवीन बोलेरो कारमुळे कायदा-सुव्यवस्था आबाधित ठेवण्यात मदत होणार आहे. भौतीकदृष्टया महत्व असलेले रावेर पोलिस स्टेशन कर्मचारी तसेच नविन गाडी देण्याची मागणी जूनी आहे. अखेर पोलिस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्या आदेश्यावरुन नुकतीच रावेर पोलिस स्टेशनला नविन बोलेरो कार प्राप्त झाली. या नवीन कारमुळे रात्रीची पेट्रोलिंग करण्यात मदत होणार आहे. आज रावेर पोलिस स्थानकात पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे,सहायक पोलिस निरिक्षक शितल कुमार नाईक, पोलिस उपनिरीक्षक मनोहर जाधव यांनी पेढे वाटप करून नविन बोलेरो कारचे स्वागत केले.