आमदार हरिभाऊ जावळेंची सहकार मंत्र्यांकडे मागणी
फैजपूर- जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल येथील हरभरा खरेदी केंद्रांना मुदतवाढ द्यावी, अशी मागणी आमदार हरिभाऊ जावळे यांनी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे एका पत्रान्वये केली आहे. रावेर येथे एक हजार 300 शेतकर्यांकडील हरभर्याची अद्यापही खरेदी झालेली नाही तर यावल येथे सुमारे 250 वर शेतकर्यांकडील हरभरा खरेदी बाकी आहे. असे असताना मुदत केवळ 29 मे पर्यंत असल्याने शेतकर्यांची गैरसोय टाळण्यासाठी दखल घ्यावी, अशी विनंती पत्रान्वये करण्यात आली आहे.